लेखिकेचे मनोगत
लोककथा ऐकणे म्हणजे टाइममशीन वापरून गतकाळात जाण्यासारखे आहे. कथा ऐकायला सगळ्यांनाच आवडते. आपल्या आवडत्या प्रदेशाबद्दल अशा कथा ऐकणं म्हणजे पर्वणीच. कोकण – आपल्या सगळ्यांचं प्रेम! सातासमुद्रापलीकडून आलेला एक इंग्रज प्रशासकीय अधिकारीसुद्धा आपल्या कोकणच्या प्रेमात पडला. आपली मराठी भाषा शिकला आणि इथल्या लोककथा त्याच्या राज्यातल्या लोकांना वाचता याव्या म्हणून त्याने त्याच्या भाषेत लिहिल्या. त्याचा हा अनुवाद! यांत प्राचीन अर्वाचीन काळाचे संदर्भ येतात आणि कथा रंजक होत जाते.
जुनी इंग्रजी आणि कथा सविस्तर सांगण्याची क्रॉफर्डची शैली आणि आपल्याच मातीतल्या कथा असे वेगळेच रसायन अनुवादक म्हणून अनुभवायला मिळाले. कोकणभूमी, गुप्त खजिना, सागरी लढाया, कोकणातले किल्ले आणि क्रॉफर्डचे काही अनुभव आपल्याला कोकणाकडे बघण्याची नवीन दृष्टी देतील. आपल्याला फारसा माहित नसलेला हा इतिहास एका इंग्रजांच्या चष्म्यातून!
चला , वाचू या – “कोकणच्या आख्यायिका”!
नीलिमा देशपांडे
लेखक – अनुवादक
दुर्मिळ कोकण-कथांचा खजिना
कथा परशूरामांच्या
परशूराम आणि समुद्रदेव यांच्यातील थरारक युध्दाच्या आणि कोकणच्या निर्मितीच्या अतिशय दुर्मिळ कथा
कथा शिवरायांच्या
शिवरायांच्या स्वराज्यातील जनजीवन दाखवणाऱ्या कथा, एका इंग्रज अधिकाऱ्याच्या लेखणीतून!
कथा पाप, पुण्याच्या
पाप आणि प्रायश्चित्तातून ईश्वर-प्राप्तीच्या, महंतांच्या उपदेशांच्या वैचारिक, उद्बोधक आणि तितक्याच रंजक कथा
कथा खजिन्यांच्या
किल्ल्यांमध्ये दडवून ठेवलेल्या खजिन्यांसाठी प्राणपणाने लढणाऱ्या वीरांच्या दुर्मिळ, थरारक कथा
कथा किल्यांच्या
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, कडे कपारींमध्ये कित्येक वर्षे दडून असलेल्या शिवरायांच्या सहकाऱ्यांच्या चित्तवेधक कथा
कथा युध्दांच्या
कोकणच्या किल्ल्यांच्या आणि हे दुर्गम किल्ले प्राणपणाने लढवणाऱ्या वीरांच्या दुर्मिळ साहस-कथा
कथा चाचे, लुटारूंच्या
हब्शी नवाब आणि कोकण किनारपट्टीवरच्या तत्कालिन आयुष्याचे गडद रंग दाखवणाऱ्या कथा
कथा लोभ, लालसेच्या
माणसाचं मन लोभी बनल्यावर आणि धनाच्या लालसेने डोळे दिपल्यावर घडणाऱ्या अघटिताच्या थरार-कथा
संग्रही ठेवावा असा अप्रतिम साहित्यिक ठेवा!
आपली प्रत आजच राखून ठेवा
माऊली एंटरप्राईजेस ‘कोकणच्या आख्यायिका’ या पुस्तकाचे अधिकृत विक्रेते आणि वितरक आहेत.
आपण पुस्तकाच्या प्रतीची ऑनलाईन खरेदी पूर्ण केल्यानंतर आपली प्रत आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी माऊली एंटरप्राईजेसची पूर्ण टीम कटिबध्द आहे.